बेस्टच्या ताफ्यात ९०० इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसचा समावेश मुंबई : मुंबईमधील डबल डेकर बस ही बेस्टची शान आहे. जुन्या बसचे आयुर्मान संपल्याने नवीन इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस घेण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ९०० इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार होत्या. मात्र एका कंत्राटदाराने माघार घेतल्याने आता ७०० बसेस वेळेवर येणार नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ९००
एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस :बेस्ट उपक्रमाला मुंबईकरांची लाईफलाईन बोलले जाते. बेस्टकडून एक मजली आणि दुमजली बसच्या माध्यमातून प्रवाशांना परिवहन सेवा पुरवली जाते. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी बेस्टने एसी आणि इलेक्ट्रिक बस कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात असलेल्या एकूण बस पैकी सुमारे अर्ध्या बस कंत्राटदाराच्या आहेत. बेस्टच्या ताफ्यातील डबल डेकर बसचे आयुर्मान संपत आले आहे. यासाठी बेस्टने ९०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
७०० बससाठी नव्याने निविदा :बेस्टच्या ताफ्यात घेतल्या जाणाऱ्या ९०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस पैकी स्विच कंपनी २०० बस देणार आहे. त्यापैकी एक बस बेस्टच्या ताफ्यात नुकतीच आली आहे. इतर १९९ बसेस लवकरच ताफ्यात येणार आहेत. मात्र बेस्टने आणखी एका कंत्राटदाराला ७०० बसची ऑर्डर दिली होती. या कंत्राटदाराने माघार घेतल्याने या बसेस घेण्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्याची माहिती बेस्टमधील अधिकाऱ्यांनी दिली. नव्याने निविदा मागवण्यात आल्याने या बसेस बेस्टच्या ताफ्यात येण्यासाठी आणखी काही उशीर होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात या बसेस ताफ्यात येवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
५० ओपन डेक बस :बेस्टच्या ५ ओपन डेक बस आहेत. या बस सध्या पर्यटकांसाठी वापरल्या जात आहेत. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी या बस मधून पर्यटक मुंबई दर्शन तसेच हेरिटेज टूरचा आनंद घेतात. पर्यटकांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमाने ५० ओपन डेक बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ओपन डेक बसचा पहिला मजला खुला असणार आहे. तर खालील मजला हा एसी असणार आहे. या बसेस पर्यावरणपूरक असून या बसेससाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -Uddhav Thackeray in Budget Sessions : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल