महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेस्टच्या मदतीला एसटी धावली, पालिकेने एसटीला दिले ३० कोटी भाडे - एसटी बसेस

मुंबईत कोरोनाचा काही प्रमाणात प्रसार कमी झाल्यावर मिशन बिगीनअंतर्गत शहरातील व्यवहार हळूहळू सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सामान्य प्रवाशांना ८ जुनपासून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. मुंबईकरांना ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी नसल्याने प्रवाशांचा सर्व भार बेस्टच्या बसेसवर आला. बेस्ट बसेसमध्ये होणारी गर्दी लक्षात बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाच्या एक हजार गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या. बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्याने या एसटी गाड्यांचे पैसे मुंबई महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला होता.

Bus
एसटी

By

Published : Nov 5, 2020, 6:27 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मिशन बिगीन अगेन अंतर्गत बेस्टमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली. सर्वसामान्य प्रवाशांसाठी बेस्ट बसेसची संख्या अपुरी पडू लागल्याने एसटी महामंडळाच्या गाड्या भाडेतत्त्वावर बेस्ट उपक्रमाने घेतल्या. एसटी गाड्यांच्या भाड्यापोटी मुंबई पालिकेने एसटी महामंडळाला आतापर्यंत ३० कोटी ७४ लाख ४६ हजार १०३ रुपये अदा केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बेस्टच्या मदतीसाठी एसटी -
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या बसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मुंबईत कोरोनाचा काही प्रमाणात प्रसार कमी झाल्यावर मिशन बिगीनअंतर्गत शहरातील व्यवहार हळूहळू सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सामान्य प्रवाशांना ८ जुनपासून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. मुंबईकरांना ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी नसल्याने प्रवाशांचा सर्व भार बेस्टच्या बसेसवर आला. बेस्ट बसेसमध्ये होणारी गर्दी लक्षात बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाच्या एक हजार गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या. बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्याने या एसटी गाड्यांचे पैसे मुंबई महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला होता.

तिकटातून एसटीला ५ कोटीचे उत्पन्न -
बेस्टच्या मदतीला एसटीच्या एक हजार बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. या एसटी बस २१ मे ते २ जुलै या कालावधीत ४९ लाख २६ हजार ९६९ किलोमीटर धावल्या आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी वगळता इतर प्रवाशांकडून ५ कोटी ५९ लाख ७ हजार ४५५ रुपये एसटी महामंडळाला मिळाल्याचे महामंडळाने पालिकेला पत्राद्वारे कळवले आहे.

प्रति किलोमीटर ४४ रुपये भाडे -
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या गाड्या पालिकेने भाडेतत्वावर घेतल्या होत्या. बसमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा दिल्यावर प्रवाशांची संख्या वाढली. त्यानंतर पुन्हा प्रति किलोमीटर ४४ रुपये या दराने एक हजार एसटी बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.

एकूण ३० कोटी भाडे -
एसटीच्या बस बेस्टने भाडेतत्वावर घेतल्या आहेत. ६ मे ते ३ जुलै या कालावधीतील भाड्यासाठी ९ कोटी ६५ लाख व २१ मे ते २ जुलै या कालावधीतील भाड्यासाठी १६ कोटी ९ लाख १२ हजार ६४२ रुपये असे एकूण ३० कोटी ७४ लाख रुपये भाड्यापोटी पालिकेने एसटी महामंडळाला अदा केले आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details