मुंबई- बेस्ट उपक्रमाकडून मुंबईकराना वीज आणि परिवहन सेवा दिली जाते. बेस्टच्या वीज ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बेस्टने 'डिजीटल पेमेंट डिस्काऊंट' व 'गो ग्रीन', असे दोन उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमानुसार डिजिटल बिल भरणाऱ्या ग्राहकांना सूट दिली जाणार आहे. तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी अधिकाधिक इलेक्ट्रिक गाड्या चालवण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.
ग्राहकांना सवलत
बेस्टच्या वीज ग्राहकांना वीजदेयके त्यांच्या सोयीनुसार भरता यावीत यासाठी बेस्टतर्फे miBEST हे ॲप, www.bestundertaking.net ही वेबसाईट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड व डेबीट कार्ड तसेच इतर बँकींग ॲप, पेटीएम, भीम ॲप, गुगल पे, ॲमेझॉन पे वगैरे सारख्या इतर माध्यमांद्वारे वीजदेयके भरण्यासाठी डिजिटल पेमेंट भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 'बेस्ट' उपक्रमात ऑनलाइन पेमेंट केल्यास एकूण वीजदेयकाच्या रकमेच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयेपर्यंत सवलत आहे. तसेच ई-बिल्स पर्याय निवडलेल्या गाहकांना प्रतिवर्ष रूपये १२० रूपये सवलत दिली जाणार आहे.
आकर्षक बक्षिस