मुंबई -बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातील थकीत कोविड भत्ता द्या आणि बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलीन करा या प्रमुख मागणीसह बेस्ट कृती समितीकडून सरकारविरुद्ध आझाद मैदानावर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बेस्टच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
बेस्ट कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन - BEST employees protest for various demands
बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातील थकीत कोविड भत्ता द्या आणि बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलीन करा या प्रमुख मागणीसह बेस्ट कृती समितीकडून सरकारविरुद्ध आझाद मैदानावर जोरदार आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री कार्यालयात दिले निवेदन-
बेस्ट कृती समितीने बेस्टचा अर्थसंकल्प, महापालिका अर्थसंकल्पता विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी कोरोनाचे कारण समोर करून मंत्रालयावर मोर्चा आम्हाला काढू दिला नाही. त्यामुळे बेस्ट कृती समितीने आझाद मैदानावर सरकार विरोधात आंदोलन केले आहे. तसेच बेस्ट कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन देण्यासाठी बोलविण्यात आले होते. बेस्ट कामगाराच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाने स्वीकारले आहे. आम्हाला आशा आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून कामगारांना न्याय देतील, अशी प्रतिक्रिया बेस्ट कृती समितीचे प्रमुख शशांक राव यांनी दिली.