मुंबई - 'बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पालिकेकडून बेस्टला ४०६ कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे ४०६ कोटी रुपये कर्ज न देता अनुदान द्यावे, असा ठराव बेस्ट समितीच्या बैठकीत तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला. परंतु, पालिका आयुक्तांनी याबाबत अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेणार आहे', अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिली.
४०६ कोटींचे कर्ज -
बेस्ट उपक्रमावर अडिच हजार कोटींचे कर्ज आहे. तर अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तूट आहे. पालिकेने बेस्टला २१०० कोटींचे अनुदान दिले आहे. आता पालिका बेस्टला आणखी ४०६ कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. बेस्टला हे कर्ज फेडताना पालिकेला वर्षाला ५० कोटी रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहे. बेस्ट हा पालिकेचा अंगीकृत उपक्रम आहे. यामुळे ४०६ कोटी रुपये कर्ज म्हणून न देता अनुदान म्हणून द्यावेत, असा ठराव बेस्ट समितीत तीन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.
भेट घेऊन प्रश्न सोडवा -