महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Best Bus Super Saver Plan : बेस्टचा प्रवाशांसाठी ‘सुपर सेव्हर’ प्लॅन, पैशांची होणार बचत - बेस्ट बस योजना

बेस्ट बस प्रशासनाकडून ‘चलो ॲप’ (Chalo App) आणि ‘चलो कार्ड’ (Chalo Card) वापरकर्त्यांसाठी ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन (Best Bus Super Saver Plan) आणला आहे. या योजनेमुळे प्रवाशांच्या पैशाची बचत होणार असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. latest news from Mumbai या प्लॅनमुळे डिजिटल प्रणालीचा वापर करणा-यांची संख्या वाढेल, असा विश्वास बेस्टला आहे.

Best Bus Super Saver Plan
बेस्टचा प्रवाशांसाठी ‘सुपर सेव्हर’ प्लॅन

By

Published : Nov 30, 2022, 8:01 PM IST

मुंबई : मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्टच्या बसमधून (Best Bus Service) ३० लक्ष प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना बेस्टकडून नेहमीच नवनवीन योजना (Best Bus Yojana) जाहीर केल्या जातात. बेस्टकडून ‘चलो ॲप’ (Chalo App) आणि ‘चलो कार्ड’ (Chalo Card) वापरकर्त्यांसाठी ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन (Best Bus Super Saver Plan) आणला आहे. या योजनेमुळे प्रवाशांच्या पैशाची बचत होणार असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. latest news from Mumbai

सुपर सेव्हर प्लॅन :बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. या अडचणीमधून बाहेर येण्यासाठी बेस्टने खासगी एसी बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कमीत कमी ५ आणि ६ रुपये इतके तिकीट आकारले जाते. बेस्टकडून काही महिन्यापूर्वी चलो ॲप आणि चलो कार्ड लॉंच केले. त्याला प्रवाशांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आहे. आता ‘बेस्ट चलो ॲप’ आणि ‘बेस्ट चलो कार्ड’ वापरकर्त्यांसाठी ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन आणला आहे. बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो कार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ३४ टक्के सवलत दिली जाणार आहे. बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅन बेस्टच्या ॲप तसेच चलो कार्डवरही उपलब्ध असणार आहे. १ डिसेंबरपासून चलो ॲपवर या प्लॅनची अंमलबजावणी सुरु होणार आहे. तर चलो कार्डवर ३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार प्रवाशांना बेस्ट वाहकाच्या माध्यमातून किंवा प्लॅन खरेदी करून याचा वापर करता येणार आहे.


३० लाख प्रवाशांकडून चलो ॲपचा वापर : मुंबईत सुमारे ३० लाख प्रवाशांनी चलो ॲप डाऊनलोड केला असून सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी त्याचा दररोज वापर करत आहेत. नोव्हेंबरमध्ये पाच लाख डिजिटल फेऱ्या दिवसाला होत होत्या. डिजिटल तिकिट प्रणालीचा अवलंब केल्यापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईकरांनी आणखी डिजिटल प्रणालीचा वापर करून प्रवास करावा, यासाठी हा नवीन प्लॅन बेस्ट उपक्रमाने तयार केला आहे. या प्लॅनमुळे डिजिटल प्रणालीचा वापर करणा-यांची संख्या वाढेल, असा विश्वास बेस्टला आहे.


असा करता येणार वापर :
- बेस्ट चलो ॲपमधील बस पास सेक्शनमध्ये हा प्लॅन आहे.
- आपल्या आवडीनुसार प्लॅन निवडून, स्वत:ची माहिती भरून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर प्लॅनची खरेदी करता येईल.
- बेस्ट बसमध्ये चढल्यानंतर ‘स्टार्ट अ ट्रीप’वर क्लिक करा.
- त्यानंतर फोनद्वारे तिकिट मशीनवर व्हॅलिडेट करा.
- व्हॅलिडेशन यशस्वी झाल्यानंतर वाहकाद्वारे डिजिटल तिकीटाची प्रिंट मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details