मुंबई - शहराची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी 'बेस्ट' बस आर्थिक संकटात आहे. या संकटातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी भाडे कपात करण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाल्याने बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे बघायला मिळत आहे.
बेस्ट उपक्रमावर अडीच हजार कोटींची कर्ज आहे. बेस्टकडे आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. यामुळे बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यासाठी बेस्टला काही सुधारणा करण्यास सांगण्यात आल्या. त्यानुसार बेस्टला खासगी भाडेतत्वावर गाड्या घेण्याची व भाडेकपात करण्याच्या सूचना करण्यात आल्या. बस भाडेतत्वावर घेण्याचा तसेच बसची भाडेकपात करण्याचे प्रस्ताव मंजूर झाल्यावर बसच्या भाडेदरात कपात करण्यात आली आहे. हे दर आजपासून लागू करण्यात आले.
बेस्टचे दर कपात केल्याचे जाहीर होताच बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. जे प्रवासी रिक्षा आणि टॅक्सीने जात होते ते प्रवासी आज बससाठी रांगा लावून प्रवास करत आहेत. स्थानकावर असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी नेहमीपेक्षा प्रवासी वाढल्याची माहिती दिली. प्रवाशांची संख्या वाढल्याने बेस्टचे कर्मचारी आता बस प्रवाशांनी भरून कशी जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आता भाडे कपातीनंतर प्रवासी वाढणार असल्याने बसची संख्या लवकर वाढवावी, अशी मागणी करताना दिसून येत आहेत.
बसचे नवीन दर -
0 ते 5 किमी 5 रू, AC 6 रू