मुंबई -कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क लावावे, गर्दीमध्ये जाऊ नये, असे आवाहन महापालिका आणि सरकारकडून केले जात आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट बसमधून प्रवास करताना मास्क लावण्यास सांगितले जाते. मात्र, मास्क लावा असे सांगितले म्हणून बेस्टच्या एका वाहकाला मारहाण करण्यात आली आहे.
'मास्क लावा' म्हटल्याने बेस्ट बस वाहकाला मारहाण
बसवाहकाने त्या प्रवाशाला तोंडाला मास्क लावण्याची विनंती केली. "मला कोरोना झाला नाही, असे सांगून तो प्रवासी शांत बसला. मात्र, जेव्हा त्याच्या उतरण्याचा कांदिवली पूर्व येथील महिंद्रा कंपनीचा बस थांबा आला तसे त्याने बस वाहकाला मारहाण करुन पळून गेला.
बुधवारी नेहमीप्रमाणे बसवाहक साईनाथ खरपडे हे बस क्रमांक 706 (मारोळ आगार ते भाईंदर स्टेशन) काम करीत असताना भाईंदर रेल्वे स्टेशनवरून मारोळकडे बस घेऊन निघाले होते. बस घोडपदेव थांब्यावर आली असता एक प्रवासी तोंडाला मास्क न लावता बसमध्ये चढला. बसवाहकाने त्या प्रवाशाला तोंडाला मास्क लावण्याची विनंती केली. 'मला कोरोना झाला नाही', असे सांगून तो प्रवासी शांत बसला. मात्र, जेव्हा त्याच्या उतरण्याचा कांदिवली पूर्व येथील महिंद्रा कंपनीचा बस थांबा आला तसे त्याने बस वाहकाला मारहाण करुन पळून गेला.
याप्रकरणी, बसवाहक साईनाथ खरपडे यांनी समता नगर पोलीस ठाण्यात केली आहे. तर जखमी बसवाहकाने रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतले आहे. पोलिसांनी याप्रकरणी साधी एनसी लिहून घेतली आहे. या घटनेचा मरोळ बस आगारातील कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला असून बेस्ट समितीचे जेष्ठ नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी, कर्तव्यावर असलेल्या बसवाहकाला रक्त येईपर्यंत मारहाण करणाऱ्या व सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीस समता नगर पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.