मुंबई : चॅट जीपीटी या सॉफ्टवेअरमुळे सहज आणि अचूक माहिती उपलब्ध होत आहे. या सॉफ्टवेअरमुळे सर्वच क्षेत्रातील लोकांना फायदा होत आहे. शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होत आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर परिणाम होणार आहे, अशी माहिती जेटकिंग इन्फोट्रेनचे सीईओ आणि एमडी, हर्ष भारवानी यांनी दिली.
शिक्षणामध्ये चॅट जीपीटीचे फायदे :शिक्षणाच्या बाबतीत चॅट जीपीटीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची झटपट उत्तरे मिळ मिळू शकतात. त्यांची कार्यक्षमता वाढून वेळेची बचत होणार आहे. हे तंत्रज्ञान शिक्षणात विद्यार्थ्यांना जटिल प्रश्न सोप्या पद्धतीने समजून घेण्यास मदत करणार आहे. शाळा महाविद्यालये काही काळापुरती शिक्षण देतात. चॅट जीपीटी २४ तास उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या तसेच वेळेच्या पलीकडे जाऊन माहिती मिळवण्यास मदत होणार आहे. चॅट जीटीपी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेच्या कौशल्यांचा सराव करण्यात मदत करू शकते. तसेच भाषा सुधारू शकते असे हर्ष भारवानी यांनी संगितले.
शिक्षणामध्ये चॅट जीपीटीचे तोटे : चॅट जीपीटीचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे सर्वसमावेशक किंवा अचूक उत्तर देण्यासाठी चॅट जीपीटीकडे पुरेसा संदर्भ नसू शकतो. याव्यतिरिक्त उत्तराला कोणता संदर्भ आहे यांचा आधार प्रदान करण्याची क्षमता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर समजुन घेतांना पडताळणी करणयाची गरज आहे. तंत्रज्ञानावरील जास्त प्रमाणात अवलंबून रहाणे ही एक चिंतेची बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वतः समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये परिणाम होऊन विचार करण्याची, उपाय शोधण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.