महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात अनलॉकला सुरुवात; कोरोना रुग्णसंख्येत काही अंशी वाढ - corona update news

आतापर्यंत 58 लाख 87 हजार 853 एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 56 लाख16 हजार 857 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.4 टक्के नोंदवण्यात आला आहे. राज्यात शुक्रवारी 11 हजार 766 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे‌. तर 8 हजार 104 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

Breaking News

By

Published : Jun 12, 2021, 2:25 AM IST

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट अटोक्यात येत असताना राज्यात टप्याटप्याने अनलॉक करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे अशा ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात येत आहे. मात्र बहुतांश भागात अनलॉक सुरू झाले आहे. त्यामुळे काही अंशी रुग्ण संख्या वाढण्याचे चित्र दिसू लागले आहे. राज्यात शुक्रवारी 11 हजार 766 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे‌. तर 8 हजार 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत 58 लाख 87 हजार 853 एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 56 लाख16 हजार 857 रुग्णांनी कोरोणावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.4 टक्के नोंदवण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती

  • राज्यात नव्या 11 हजार 104 रुग्णांची नोंद
  • आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या 58 लाख 87 हजार 85
  • 24 तासांत 406 रुग्णांचा मृत्यू
  • 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8,104
  • आतापर्यंत एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 56 लाख16 हजार 857

कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची 24 तासात नोंद

  • मुंबई महानगरपालिका - 721
  • ठाणे - 100
  • पालघर - 267
  • वसई विरार - 157
  • रायगड - 472
  • नाशिक - 185
  • अहमदनगर - 689
  • पुणे - 866
  • पुणे महानगरपालिका - 301
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका - 233
  • सोलापूर - 438
  • सातारा - 715
  • कोल्हापूर - 1258
  • कोल्हापूर महानगरपालिका - 511
  • सांगली -1151
  • सांगली पालिका - 218
  • सिंधुदुर्ग - 408
  • रत्नागिरी - 798
  • औरंगाबाद - 119
  • उस्मानाबाद - 132
  • बीड - 239
  • चंद्रपूर - 109

हेही वाचा - MAHACORONA UPDATES : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ABOUT THE AUTHOR

...view details