मुंबई :महाराष्ट्रातही आता मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा (Medical Education In Marathi) उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमबीबीएस सह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यासारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आता मराठीतून उपलब्ध ( Medical Education In Marathi) करून दिले जाणार आहेत. २०२३ च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून (Medical Course Marathi in Maharashtra) उपलब्ध (become doctor studying medical courses in Marathi) होतील. विशेष म्हणजे, वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतल्यानंतर निर्णय आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण दिले जाणार आहे. (medical courses in Marathi State governments decision) (Mumbai Latest News)
वैद्यकीय शिक्षण स्थानिक भाषेतून -याविषयी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचाच एक भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण स्थानिक भाषेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील तयारी काही महिन्यातच पूर्ण होईल. तज्ज्ञांचा सहभाग समितीत असून अतिशय काटेकोरपणे हा वैद्यकीय अभ्यासक्रम बनविण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत म्हणून तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीतील सर्व सदस्य हा अभ्यासक्रम पाहूनच पुढे याला अंतिम स्वरूप देतील असेही गिरीश महाजन म्हणाले. एमबीबीएस सह इतरही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून करण्यात येणार आहेत; परंतु तूर्तास एमबीबीएसला प्राधान्य देण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण इंग्रजीतून घ्यावे की मराठीतून याचे पूर्ण स्वातंत्र्य विद्यार्थ्याला असेल असेही महाजन म्हणाले.