महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eknath Shinde Ayodhya Visit : माझ्यामुळे घरात बसणारे लोकं आता घराबाहेर पडले, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला - उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदेंची टीका

आज आम्ही अयोध्येला जात आहोत म्हणून सर्वांना तिकडे जावेसे वाटते आहे. आधी लोक घरात बसून राहायचे आमच्यामुळे ते घरातून बाहेर पडून फिरू लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधले जात असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

Eknath Shinde
Eknath Shinde

By

Published : Apr 7, 2023, 7:04 PM IST

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या अयोध्या मंदिराला ते भेट देतील आणि शरयू नदीवरील आरतीमध्ये सहभागी होतील. या पार्श्वभूमीवर आज ठाण्याहून अयोध्येसाठी विशेष गाडी रवाना झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.





अयोध्येच्या हिताची बाब : यावेळी बोलताना, आज ठाणे आणि नाशिक येथून दोन गाड्या अयोध्येसाठी रवाना होत आहेत. शिवसैनिक आणि रामभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. उद्या हे लोक अयोध्येला पोहोचतील. रविवारी सकाळी त्यांना रामलल्लाचे दर्शन होणार आहे. मी त्यांना भेटायला आणि निरोप घ्यायला आलो आहे. अयोध्या हा आपल्यासाठी श्रद्धेचा आणि उत्कटतेचा विषय आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अयोध्येत जाण्याचा योग येतो तेव्हा प्रत्येकजण उत्साही होतो.





आमच्यामुळे लोक घराबाहेर पडले :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आम्हीही श्री रामाचा आदर करतो. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आम्ही अयोध्येला जात असल्याचे विधानही केले आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्यामुळेच सर्वांना अयोध्येला जायचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पूर्वी लोक घरातच बसायचे. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले की, आता माझ्यामुळेच लोक घराबाहेर पडू लागले आहेत.





पंतप्रधानांचे आभार:राम मंदिर, श्री राम हा आपल्या आवडीचा विषय आहे. राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य भक्तांची इच्छा पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली आहे. राम मंदिर उभे राहावे, ही बाळासाहेब ठाकरेंचीही इच्छा होती. ती इच्छा पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यामांना दिली आहे.







राम मंदिराला भेट देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिलला अयोध्येत पोहोचणार असून ते राम मंदिराला भेट देतील. शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस कॅप्टन अभिजित अडसूळ आणि राज्य प्रभारी विक्रम सिंह गुरुवारी अयोध्येला पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी 7 आणि 8 एप्रिल रोजी लखनौ ते अयोध्येपर्यंत सुमारे 1 हजार 500 बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात बॅनर आणि पोस्टर लावण्याची तयारी करत आहेत.







सुरक्षेसाठी 100 वाहनांचा ताफा : गेल्या वर्षी जूनमध्ये आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याप्रमाणेच या वेळीही अधिक तयारी दिसून येईल, असे शिवसेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अभय दिवेदी यांनी सांगितले. हा कार्यक्रम संस्मरणीय व्हावा यासाठी संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. लखनौच्या अमौसी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर त्यांना 100 वाहनांच्या ताफ्यासह अयोध्येत आणले जाईल. सुरक्षा आणि इतर व्यवस्थेबाबत प्रशासनाला कळवण्यात आले आहे. अयोध्या, फैजाबादमधील जवळपास सर्व लहान-मोठी हॉटेल्स ८ आणि ९ एप्रिलसाठी बुक करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे २ हजार ५०० शिवसैनिकांची राहण्याची सोय होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी सुमारे 8 हजार शिवसैनिक अयोध्येत पोहोचणार आहेत.







मुख्यमंत्री शिंदे यांचा संपूर्ण दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येतील राम मंदिर, हनुमान गढीचे दर्शन, पूजा आणि मंदिर उभारणीच्या जागेला भेट देणार आहेत. तसेच सिंदे सरयू आरती, लक्ष्मण किला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. शिवसैनिक आज विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले आहेत, तर मुख्यमंत्री शिंदे ९ एप्रिलला अयोध्येत पोहोचतील. संध्याकाळी सरयू आरती करून ते मुंबईला परततील.

ABOUT THE AUTHOR

...view details