मुंबई:जसजसे इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत आहे. तसे दिवसेंदिवस सायबर क्राईमचे जाळे वाढत आहे. अशातच दिवाळी तोंडावर आली आहे. यादरम्यान, नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे, सजावटीच्या वस्तू, घरात नव्या वस्तू, पणत्या आदी वस्तूंची घरबसल्या गर्दीत न जाता ऑनलाईन दिवाळीसाठी खरेदी करणं पसंत करतात. अशावेळी लोकांनी सावधान राहणं गरजेचं आहे. कारण दिवाळीच्या सणात सायबर ठग फसवणुकीसाठी तयार आहेत. यासाठी ईटीव्ही भारतशी सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी ग्राहकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे, आणि ऑनलाईन शॉपिंग करताना काय सतर्कता बाळगायची याबाबत माहिती दिली आहे.
Diwali Celebration : दिवाळीत ऑफरला भुलून ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर सावधान - ऑनलाइन कंपन्यांच्या मोठ्या ऑफर
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सध्या ऑनलाइन शॉपिंगचा (diwali online shopping) बाजार तेजीत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या कंपन्या मोठ मोठ्या ऑफर (offers from online companies) देत आहेत. त्याला भुलून लोकही कमी किंमतीत समजुन वस्तु मागवत आहेत आपणही अशीच शाॅपिंग करत असाल तर सावधान आपली फसवणुक होऊ नये यासाठी (be aware from cyber fraudulent) अशी काळजी घ्या
आकर्षक प्रलोभने : दिवाळीच्या निमित्ताने शॉपिंग वेबसाइट्सवर ऑनलाईन सेल Online sale on websites, ऑफर सुरू आहेत. दरवर्षी प्रमाणे अनेकविध आदी शॉपिंग वेबसाईटवर वेगवेगळ्या उत्पादनांवर आकर्षक प्रलोभने पण दिली जात आहेत यात दिलेल्या डिस्काउंट (Discounts on website products) मुळे ग्राहकांचे चित्त विचलीत होत आहे. मोबाईलपासून ते टीव्ही, लॅपटॉप, कपडे या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करू शकता. मात्र, अनेकदा डिस्काउंटच्या नादात नुकसान देखील होते.
या गोष्टी लक्षात ठेवा : नेहमी सुरक्षित वेबसाइट्सवरून शॉपिंग करा. URL मध्ये https:// वेबसाईट च्या आधि जर असे असेल तरच ती वेबसाईट सुरक्षित मानली जाते.. तुमच्या सिस्टममध्ये अँटी- व्हायरस अपडेट ठेवा. तसेच, कोणी खासगी, बँक माहिती, ओटीपी मागितल्यावर सावध व्हा. अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. व्हॉट्सॲप, फेसबुक सारख्या ॲपवर तुमच्या बँक खात्याची माहिती शेअर करू नका. जर तुम्हाला ऑफर खूपच आकर्षक वाटत असल्यास त्वरित सावध व्हा. कारण, कोणतीही वस्तू कधीच मोफत किंवा अत्यंत कमी किमतीत कोणत्याही कारणाने मिळत नसते हे नेहमी लक्षात ठेवा.