महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BDD Chalis: बिडीडी चाळींचा पुनर्विकास होणार! 15,593 सदनिका निर्माण होणार; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

बिडीडी चाळींचा पुनर्विकास कधी होणार याबाबत जनतेमध्ये उत्सुकता होती. आज ती उत्सुकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे अधिकच ताणली गेलेली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

By

Published : Nov 1, 2022, 10:49 PM IST

मुंबई - बिडीडी चाळींचा पुनर्विकास कधी होणार याबाबत जनतेमध्ये उत्सुकता होती. आज ती उत्सुकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे अधिकच ताणली गेलेली आहे. आज मंगळवार (दि. 1 नोव्हेंबर)रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आढावा घेत त्यांनी सर्व चाळी मिळून 15 हजार 593 सदनिका निर्माण होणार असल्याचे जाहीर केले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील महिनाभरात लागू होऊ शकतील, असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील प्रख्यात आणि विकासाच्या नावाने रखडलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आज विविध विभागांचे अधिकारी यांच्यासोबत बैठकीत आढावा घेऊन वरळीतील चाळींचे काम सुरू झाले असून आता नायगाव येथील डीडी चाळीचे पुनर्विकासाचे काम जानेवारी 2023 मध्ये सुरू होत आहे. एकूण 15 हजार 593 सदनिका यामुळे निर्माण होणार आहे अशी माहिती दिली आहे.

याबाबत मुमुंबईतील समाजिक कार्उयकर्पते आनंदा होवाळ म्हणाले, ''उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयामुळे बिडीडी चाळीचा प्रश्न सुटण्यास मार्ग मोकळा झालेला आहे. हे काम किती लवकरात लवकर सुरू होते याकडे आता जनतेचे लक्ष असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details