महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू, राज्य सरकारची परवानगी - नवीन वर्ष साजरे

नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या परिक्षेत्रात 31 डिसेंबरला रात्री दीडऐवजी पहाटे 5 वाजेपर्यंत जल्लोष करण्यास परवानगी दिली आहे. या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्‍लब, पबमध्ये मद्यविक्रीही करता येणार आहे.

मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू
मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू

By

Published : Dec 31, 2019, 2:59 AM IST

ठाणे- नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्रभर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नवी मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्‍लबमध्ये 31 डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्री आणि करमणूक कार्यक्रमांना मुभा देण्यात आली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. हॉटेल्स, पब्स, क्‍लबमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. मद्य, भोजनाच्या आस्वादासमवेत करमणुकीचे कार्यक्रमही आखले जात आहेत. नववर्ष स्वागताच्या या आनंदात कोणतेही विरजन पडू नये, यासाठी हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनने हॉटेल्सची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.

या मागणीनुसार नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या परिक्षेत्रात 31 डिसेंबरला रात्री दीडऐवजी पहाटे 5 वाजेपर्यंत जल्लोष करण्यास परवानगी दिली आहे. या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्‍लब, पबमध्ये मद्यविक्रीही करता येणार आहे. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने नवी मुंबई परिसरात दोन हजार अधिकारी व कर्मचारी, वाहतूक विभागाचे 350 कर्मचारी अधिकारी, मुख्यालयातील अतिरिक्त 300 कर्मचारी 150 होमगार्ड व फिरस्ती गस्त पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू

मद्य विक्रीबाबत परवानाधारकांना मद्यविक्री करण्याची परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्यास तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास अथवा नाका-बंदी पेट्रोलिंग दरम्यान विनापरवाना मद्यप्राशन केलेले कोणी आढळल्यास त्यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details