मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना घाटकोपर, पंतनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बाहेर ग्राहकांनी रांगा लावल्याची बातमी ‘ईटीव्ही भारत’ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल बँक ऑफ महाराष्ट्रने घेतली असून बँकेबाहेर लागणाऱ्या रांगा कमी केल्या आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याला काही प्रमाणात आळा घालता येणार असल्याने घाटकोपरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे रोज 1200 ते 1700 रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्यात सर्वाधिक रुग्ण घाटकोपरच्या एन विभागाच्या हद्दीत आढळून आले आहेत. त्याच दरम्यान घाटकोपर पंतनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. एटीएम, पैसे भरण्याची मशीन बंद असल्याने तसेच वयोवृद्ध ग्राहक पेन्शनचे पैसे काढण्यास बँकेत येत असल्याने ग्राहकांच्या रांगा लागत होत्या.