महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'..तर आम्ही इथेच जीव देऊ! आम्ही भीक नाही हक्काचे पैसे मागत आहोत' - मुंबई आंदोलन बातमी

पीएमसी बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध लादले होते. आयुष्याची ठेवी अडकल्यामुळे लाखो खातेधारक हवालदील झाले आहेत. आपली आयुष्याची कमाई बुडाल्याच्या भीतीने अनेक खातेधारक चिंतेत पडले आहेत. याच तणावातून आतापर्यंत 10 पेक्षा जास्त खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. मात्र, खातेधारकांचे पैसे कधी परत मिळणार हे अजूनही सांगण्यात येत नाही.

bank-account-holder-protest-against-pmc-bank-in-mumbai
पीएमसी बँक खातेधारकांचे आझाद मैदानात आंदोलन

By

Published : Feb 12, 2020, 9:15 PM IST

Updated : Feb 12, 2020, 11:23 PM IST

मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत मोठा घोटाळा झाला. या बँकेतील खातेधारक आजही आपले पैसे परत मिळतील या आशेवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आम्ही भीक नाही तर आयुष्यभर कमावले पैसे मागत आहोत. बजेट जाहीर झाले पण पंजाब आणि महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेबाबत एकही शब्द काढण्यात आला नाही. जर आमचे पैसे परत मिळाले नाही तर आम्ही इथेच जीव सोडू, असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.

पीएमसी बँक खातेधारकांचे आझाद मैदानात आंदोलन

हेही वाचा-मुंबई हल्ल्याचा दौषी हाफिज सईदला पाकिस्तानी न्यायालयाने ठरवले दोषी!

पीएमसी बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध लादले होते. आयुष्याची ठेवी अडकल्यामुळे लाखो खातेधारक हवालदील झाले आहेत. आपली आयुष्याची कमाई बुडाल्याच्या भीतीने अनेक खातेधारक चिंतेत पडले आहेत. याच तणावातून आतापर्यंत 10 पेक्षा जास्त खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. मात्र, खातेधारकांचे पैसे कधी परत मिळणार हे अजूनही सांगण्यात येत नाही.

आम्ही आमच्या आयुष्याची ठेवी या बँकेत ठेवली. मात्र, या बँकेत घोटाळा झाल्यामुळे ठेवी अडकली आहे. अनेक महिने होऊनसुद्धा आमचे पैसे कधी मिळणार हे सांगण्यात येत नाही. कारवाई सुरू आहे. मात्र, पैसे कधी मिळणार हा प्रश्न मात्र कायम आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. आम्हाला लागणारे पैसे कुठून आणायचे. आमच्या मुलांची लग्न रखडली आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आमचे पैसे परत द्यावे, अन्यथा आम्ही आंदोलन सुरूच ठेवू अशा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Last Updated : Feb 12, 2020, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details