महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: बोरिवलीत फिरणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला, एमएचबी पोलिसांची कामगिरी - अबिनुल दाऊद शेख

अनेक महिन्यांपासून मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील परीसरात अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास अटक करण्यात आली आहे. एमएचबी पोलिसांनी सापळा रचून बांगलादेशी अबिनुल दाऊद शेख याला अटक केली आहे.

Bangladeshi Citizen Arrested
बांगलादेशींला अटक केली

By

Published : May 10, 2023, 10:56 PM IST

माहिती देताना सुधीर कुंडलकर

मुंबई: मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे असलेल्या एमएचबीपोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली. जो अनेक महिन्यांपासून अवैधरित्या भारतात आला होता आणि व्हिसा पासपोर्टशिवाय मुंबईत राहत होता. अबिनुल दाऊद शेख (३२) असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. जो कुथोली गाव, ठाणे-कालिया जिल्हा-बांगलादेशातील नडियालचा रहिवासी आहे.



बांगलादेशी नागरिकाला अटक: एमएचबी पोलीस स्टेशनच्या ATC पथकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सिद्धे यांना एक बांगलादेशी नागरिक गणपत पाटील नगरमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बांगलादेशी अबिनुल दाऊद शेख (32) याला गणपत पाटील नगर गली क्रमांक 14 नवीन लिंक रोड येथे अटक करण्यात आली. ज्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही कागदपत्र नव्हते.



विदेशी कायदानुसार गुन्हा दाखल: एमएचबी पोलिसांनी अबिनुल दाऊद शेख (32) विरुद्ध कलम 3, 6 पासपोर्ट (भारतात प्रवेश) 3(1)(a) फॉरेनर्स ऑर्डर 1948 कलम 14 विदेशी कायदा 1946 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो बांगलादेशातून भारतात कसा आला आणि त्याच्यासोबत किती लोक भारतात आले, याचा एमएचबी पोलीस तपास करत आहेत. एवढेच नाही तर ते कोणत्या बेकायदेशीर कामात सहभागी आहेत का, याचाही एमएचबी पोलीस तपास करत आहेत. यापूर्वीही एमएचबी पोलिसांनी 2 बांगलादेशींना अटक केली होती. उपनगरातील बोरीवली पश्चिम भागात मागील पंधरा ते वीस वर्षांपासून वास्तव्यास होते. ही कामगिरी मुंबई पोलिसांच्या अँटी टेररिझम सेलने केली होती. त्यांना बोरीवली पश्चिमेकडील भाजी मार्केट आणि एमटीएनएल बस स्टॉप या ठिकाणाहून दोघाही घुसखोरांना ताब्यात घेतले होते.



हेही वाचा -

  1. Whale vomit साडेपाच कोटीचे अंबरग्रीस साताऱ्यात जप्त कोल्हापूर रत्नागिरीतील चौघांना अटक
  2. Soybean Theft Case धुळे एमआयडीसीतील कंपनीतून सोयाबीनची चोरी सहा जणांना अटक
  3. Drug Smugglers Arrested ७१ लाखांच्या अमली पदार्थांसह अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरातून २ ड्रग्ज तस्करांना अटक मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट १२ची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details