मुंबई Bangladeshi Accused : दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमधून दोषारोप सिद्ध होऊन न्यायालयानं शिक्षा सुनावलेला आरोपी सोमवारी सकाळी बाथरूमच्या भिंतीवर चढून पळून गेला. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम कायदा कलम 14 (क) भारतीय दंड संविधान कलम 224 आणि परकीय नागरिक आदेश कलम 11 (2) अन्वये पळून गेलेल्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काळचौकी एटीएसमधून पळून जाणारा आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती मिळत आहे. अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजु अबुल हाषिम शेख असं पलायन केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर काळाचौकी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत.
एटीएसनं अटक केलेला बांगलादेशी आरोपी तुरुंगातून पळाला, पोलिसांची वाढली डोकेदुखी - Mumbai Crime News
Bangladeshi Accused : काळाचौकी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये शिक्षा भोगत असलेल्या आरोपीनं बाथरूमच्या भिंतीवर चढून पलायन केल्यानं पोलिसांत एकच खळबळ उडालीय. त्याला न्यायालयानं शिक्षा सुनावली हेती.
Published : Nov 22, 2023, 11:57 AM IST
विविध गुन्ह्यांखाली भोगत होता शिक्षा : आरोपी अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजु अबुल हाषिम शेख याला 8 डिसेंबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. 6 मार्च 2023 मध्ये किल्ला कोर्टात त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. आरोपी अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजु अबुल हाथिम शेख याला सुनावणी दरम्यान आरोपीनं गुन्हा कबूल केल्यानं 29 सप्टेंबर 2023 रोजी न्यायालयानं 10 महिने कारावास आणि पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास दोन दिवसाठी कारावास अशी शिक्षा सुनावली होती. तसंच या न्यायालयाच्या निकालामध्ये आरोपीस प्रत्यार्पण करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगानं प्रादेशिक परकीय नागरिक नोंदणी अधिकारी, तथा पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा-2 या कार्यालयाशी पत्र व्यवहार करण्यात आला होता. आरोपीनं नमूद शिक्षा पूर्ण भोगल्यानंतर त्याला 1 नोव्हेंबर 2023 ला एटीएस काळाचौकी युनिट यांच्या ताब्यात देण्यात आलं होतं.
एटीएसच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात निगराणीत : या आरोपीविरुद्ध परकीय नागरिक आदेश 1948 चे कलम 11 (2) अन्वये रिस्ट्रीक्शन ऑर्डर जारी करून त्याला पोलिसांच्या प्रतिबंधीत निगाराणीखाली ठेवता यावे याकरिता प्रादेशिक परकीय नागरिक नोंदणी अधिकारी तथा पोलीस उपायुक्त विशेष शाखा-2, गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडुन रिस्ट्रीशन ऑर्डर निर्गमित केलेली आहे. या आरोपीची प्रत्यार्पणाची कार्यवाही दहशतवाद विरोधी पथक काळाचौकी युनिट या कार्यालयाच्या पोलीस उप निरीक्षक तृप्ती पाटील यांनी प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अन्वर या आरोपीस एटीएसच्या काळाचौकी युनिट कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात प्रतिबंधीत निगराणी खाली ठेवण्यात आलं होतं.
बाथरुममधून गेला पळून : दरम्यान सोमवारी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजु अबुल हाथिम शेख यानं प्रातर्विधीला जायचं सांगून तो बाथरुममध्ये गेला. त्यानंतर तो बाथरूम मधील भिंतीवर चढून उडी मारून पळून गेला. आरोपी पळून गेल्याचं लक्षात येताच काळाचौकी एटीएस युनिट मधील अधिकारी व अंमलदार यांनी आजूबाजूचा परिसर कळापैकी पोलीस ठाणे परिसर, कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन, शिवडी रेल्वे स्टेशन, सी.एस.टी. रेल्वे स्टेशन, लोकमान्य टिकळ टर्मिनस व टिळक नगर रेल्वे स्थानक, वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर व वरिल ठिकाणच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून शोध घेतला असता तो आढळून आला नाही.
हेही वाचा :