मुंबई: मुंबईला येणाऱ्या धमक्यांचे कॉल आणि मेसेजेस या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सणासुदीच्या तोडांवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या दरम्यान वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांसंदर्भात मुंबई पोलिसांनी नवे आदेश काढले आहेत. या संदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेले कोणतेही आदेश असले, तरी जनतेला अडथळा, गैरसोय, त्रास, धोका किंवा नुकसान टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त संजय लाटकर Deputy Commissioner of Police Sanjay Latkar यांनी हे आदेश दिले आहेत.
बंदी लागू करण्यात आलीतसेच 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत आकाश कंदील उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. चायनीज फ्लाइंग कंदीलांच्या वापर आणि विक्री करण्यावर देखील 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईचे डीसीपी संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. आकाशात कंदील उडवल्याने लोकांच्या जीव धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.