मुंबई :आपण बेरीज करताना समजा 10 या अंकाची बेरीज करायची असेल तर आपण पाच अधिक पाच दहा, आठ अधिक दोन दहा या पध्दताने बेरीज करतो. मात्र यापेक्षा गणितामध्ये एकत्रित बेरीज करण्याची जी अॅबकस पद्धत आहे, त्या पध्दताने अथर्व गुजरने (Balveer Atharva Gujar) कमी वेळामध्ये खूप मोठी संख्या म्हणजे 500 पर्यंत ची बेरीज अल्पावधीत (set record for scoring 500 Cumulative Sum) करून दाखवली आणि त्याने आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले. तर विशेष म्हणजे हा विक्रम अथर्वने डोळ्यावर पट्टी बांधून (short time while blindfolded) केलेला आहे हे विशेष.
प्रतिक्रिया देतांना अथर्व गुजर व त्याचे कुटूंबिय
डोळ्यांवर पट्टी बांधून कमीत कमी वेळेत एकत्रित एकूण 500 गुण बेरीज करून; उत्तर सोडवणे हा विक्रम डोंबिवलीतील अथर्व उत्तम गुजर याने केला आहे. 29 जून 2021 रोजी 8 वर्षे, 10 महिने आणि 17 दिवस वयाच्या अथर्वने डोळ्यांवर पट्टी बांधून 9 मिनिटे आणि 21 सेकंदात 1 ते 500 (संचयी बेरीज) पर्यंत संख्यांची सतत बेरीज केली. यावरुन त्याची स्मरण शक्ती दांडगी ठरली.
अथर्व गुजर सोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्याने सांगितलं की, 'माझ्या आईच्या मदतीने मी हे केलं आणि क्लासला जात होतो. त्या ठिकाणी हे जे गणित शिकत होतो व आहे त्यामुळे मला हे जमलं. एकत्र गोळा बेरीज करणे आणि ती डोळ्यावर पट्टी बांधून करणे यासाठी मी भरपूर सराव केला आणि मला 500 पर्यंतचे जे क्रमांक आहे. त्याची एकूण बरोबर गुळाबेरीच करता आली आणि ती उचित ठरली. त्याच्यामुळे मला इंडिया बुक रेकॉर्ड चा विक्रम करता आला.
अथर्वची आई शुभांगी गुजर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ,'खरंतर याला गणिताची थोडी आवड होतीच, पण मी त्याकडे लक्ष दिलं आणि हा क्लासमध्ये देखील त्याबद्दलचा सराव करायचा. याने मला एकदा घरी अॅबकस पध्दतीने गणितं करुन दाखवल्यालंतर मला आम्हाला आश्चर्य वाटलं. कोणाला विश्वास बसणार नाही. इंडियाबुक रेकॉर्ड च्या वेळी त्यांना देखील सुरुवातीला हे खरं नव्हतं वाटत. म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून त्याचा व्हिडिओ केला आणि त्याने बरोबर नऊ मिनिटं 21 सेकंदामध्ये एकत्रित पाचशे पर्यंतच्या संख्येची बेरीज करून दाखवली. ज्याला क्युमुल्लेटिव्ह सम असे इंग्रजी मध्ये म्हटले जाते.'