मुंबई: मुंबईतील बोरीवलीत काल एका इमारतीचा भाग कोसळला होता. (building collapsed in borivali). ही घटना ताजी असताना आज गोवंडी येथे एक तीन मजली घराची बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे तर २ जण जखमी झाले आहेत. (Balcony Collapsed In Trombay). या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
Balcony Collapsed In Trombay: तीन मजली घराची बाल्कनी कोसळली, एकाचा मृत्यू - दत्त नगर झोपडपट्टी
ट्रॉम्बेतील गोवंडी येथे तीन मजली घराची बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे तर २ जण जखमी झाले आहेत. (Balcony Collapsed In Trombay). या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
दत्त नगर झोपडपट्टीतील घटना:मिळालेल्या माहितीनुसार ट्रॉम्बे चीता कॅम्प बंधन बँक येथे दत्त नगर झोपडपट्टी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीन मजली झोपड्या बनवण्यात आल्या आहेत. यापैकी एका तीन मजली झोपडीतल्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनी आज सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कोसळली.
यात तीन जण जखमी झाले. तिघांना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी प्रणव माने (वय ४) याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. तर प्रिंस कोळजी (वय ८) व जाफर मंडल (वय ४५) या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.