महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने काढलेला मोर्चा म्हणजे नाटक - बाळासाहेब थोरात - pik vima

पीक विमा कंपन्याविरोधात शिवसेनेने काढलेला मोर्चा म्हणजे नाटक असल्याचे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीका केली.  शिवसेना मोर्चा काढून जबाबदारी झटकत असल्याचेही थोरात म्हणाले.

शिवसेनेने काढलेला मोर्चा म्हणजे नाटक - बाळासाहेब थोरात

By

Published : Jul 17, 2019, 3:22 PM IST

मुंबई - पीक विमा कंपन्याविरोधात शिवसेनेने काढलेला मोर्चा म्हणजे नाटक असल्याचे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीका केली. शिवसेना मोर्चा काढून जबाबदारी झटकत असल्याचेही थोरात म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विमा कंपन्यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने आज मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक विषय घेऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आज रस्त्यावर उतरले होते. 'भारती एक्सा' या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. याच मुद्यावरुन थोरात यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.


शेतकरीच आता या मोर्चेकऱ्यांचा निषेध करतील

शिवसेनेचा मोर्चा म्हणजे नाटक असल्याचे थोरात म्हणाले. याच भाजप-सेनेच्या सरकारने खासगी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रडविले आहे. शेतकरी बांधवच आता या मोर्चेकऱ्यांचा निषेध करतील असेही थोरात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details