महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayshree Kalelkar Passed Away : बाळासाहेबांची सून जयश्री कालेलकर-ठाकरे यांचे निधन - Balasahebs daughter in law Jayashree Kalelkar

दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची मोठी सून जयश्री कालेलकर (Jayshree Kalelkar) ठाकरेंचे आज सकाळी सात वाजता निधन झाले. सुप्रसिध्द मराठी नाटककार मधुसूदन कालेलकर (Madhusudan Kalelkar) यांची मुलगी तर जयदेव ठाकरेंच्या त्या पहिली पत्नी होत्या.

Jayshree Kalelka Passed Away
जयश्री कालेलकर-ठाकरेंचे निधन

By

Published : Nov 8, 2022, 3:27 PM IST

Updated : Nov 8, 2022, 3:48 PM IST

मुंबई:दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची मोठी सून जयश्री कालेलकर (Jayshree Kalelkar) ठाकरेंचे आज सकाळी सात वाजता निधन झाले. सुप्रसिध्द मराठी नाटककार मधुसूदन कालेलकर (Madhusudan Kalelkar) यांची मुलगी तर जयदेव ठाकरेंच्या त्या पहिली पत्नी होत्या.


आज मृत्यू झाला: जयश्री यांना कॅन्सरची बाधा झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्या कॅन्सरशी (Cancer) झुंज देत होत्या. मुंबईतील टाटा रुग्णालयात (Tata Hospital) जयश्री यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतेच त्यांना टाटा रुग्णालयातून घरी आणले होते. रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) उपचार्थ दाखल केले. परंतु, सकाळी 7 वाजता त्यांचा आज मृत्यू झाला.


जयदेव ठाकरे यांची पहिली पत्नी: जयश्री कालेकर या प्रसिद्ध मराठी नाटककार मधुसूदन कालेलकर यांची मुलगी होत्या. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांची पहिली पत्नी जयश्री कालेलकर यांच्याशी घटस्फोट घेतला आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये वादाला सुरुवात झाली. त्यानंतर जयदेव ठाकरे यांनी स्मिता यांच्याशी लग्न केले. शिवसेनेतल्या बंडानंतर या दोघांनीही शिंदे गटात प्रवेश असून ते दोघेही चर्चेत आले आहेत.

Last Updated : Nov 8, 2022, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details