:23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती साजरी होत आहे. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक आणि प्रखर हिंदुत्वाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या निधनाला दहा वर्ष झाले आहेत आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येत आहे. बाळासाहेबांच्या फोटो अनावरण सोहळ्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांना निमंत्रित केले आहे.
उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशिवाय त्यांचे नातू निहार बिंदुमाधव ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे की, हा कार्यक्रम राजकीय नाही. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ते व्यंगचित्रकार, पत्रकार, वक्ते, मास लीडर मानले जातात. त्यांनी कधीही राजकीय पद भूषवले नाही. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत आज षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत हिदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रोकठोक विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत रहायचे. एकदा बोललेला शब्द त्यांनी कधी वापस घेतला नाही. पक्ष वाढवला, सत्तेत आणला आणि शेवटपर्यंत आपला झंझावात कायम ठेवला.
एका निवांत क्षणी बाळासाहेब बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी त्यांनी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली. त्यांनी कधीही कोणाचीही पर्वा न करता आपली मते नेहमीच परखडपणे मांडली. बाळासाहेब म्हणजे मराठी माणसाचा बुलंद आवाज होता. मराठी माणसाची गळचेपी, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद असो, बाबरी मशिदीचा मुद्दा असोत, किंवा थेट पाकिस्तान बाबतची भूमिका असो, बाळासाहेबांची तोफ धडधडत राहिली. त्यामुळे ते नेहमीच तमाम देशातील नागरिकांच्या गळ्यातलं ताईत राहिले. आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वादळ उभी केली.
सरकार चित्रपटात अमिताभ बाळासाहेबांच्या लुक मधे होते बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते तसेच एक पत्रकार देखील होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या आईचे नाव रमाबाई. एकूण नऊ भावंडांपैकी बाळासाहेब ठाकरे हे सर्वात मोठे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रस्थानी होते. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.
वाढदिवसाच्या दिवशी बाळासाहेब चाहत्यांचे अभिवादन स्विकारायचे पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी इंग्रजी वृत्तपत्रातून केली. या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी पहिल्यांदा नोकरी मिळवली. 13 जून 1948 ला बाळासाहेब ठाकरे यांचं लग्न मीनाताई ठाकरे यांच्याशी झाले. नोकरीमध्ये त्यांना रस वाटत नव्हता म्हणून 1960 साली त्यांनी आपलं स्वतःचं मार्मिक हे साप्ताहिक सुरु केले. मार्मिक च्या माध्यमातून महाराष्ट्रातले आणि मराठी माणसाचे प्रश्न त्यांनी समोर आणण्याची सुरुवात केली.
रोखठोक वक्तव्यासाठी ते प्रसिद्ध होते न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना महाराष्ट्रात त्यावेळी वाढणारी गैरमराठी लोकांची लुडबुड यावर भाष्य करणारी व्यंगचित्र त्यांनी मार्मिकमधून प्रसिद्ध केली. महाराष्ट्रातच मराठी माणसावर होणारा सततचा अन्याय, शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात मराठी तरुणांची होणारी फरपट पाहून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी एक संघटना हवी असा विचार बाळासाहेबांच्या डोक्यात आला. सुरूवातीच्या काळात शिवसेना हा राजकीय पक्ष नसून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक संघटना होती.
बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी भेटीचा फोटो चर्चेत असतो मनोहर जोशी यांना पहिले मुख्यमंत्री बनवले 19 जून 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रात असलेल्या अनेक छोटे मोठे राजकीय पक्षांशी हातमिळवणी करत त्यांनी राज्यभर हा पक्ष पसरवला. मात्र भारतीय जनता पक्षा सोबत युती करुन राज्यात 1995 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार सत्तेवर आले. बाळासाहेब ठाकरे यांनी युतीच्या सरकारमध्ये मनोहर जोशी यांना पहिले मुख्यमंत्री बनवले.
बाळासाहेबांची एक वेगळी स्टाईल असायची 17 नोव्हेंबर 2012 साली अनंतात विलीन आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमीच चर्चेत असायचे. अशाचं एका वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मतदानासाठी थेट सहा वर्षाची बंदी आणली होती. 11 डिसेंबर 1999 ते 10 डिसेंबर 2005 याकाळात बाळासाहेबांवर मतदानासाठीची बंदी होती. 17 नोव्हेंबर 2012 साली बाळासाहेब ठाकरे हे अनंतात विलीन झाले. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारा होता. कधीही न थांबणारी मुंबई त्यादिवशी पूर्णपणे शांत होती.
शेवटपर्यंत आपला झंझावात कायम हेही वाचा : Balasaheb Thackeray Birth Anniversary : एनडीएतून बाहेर पडूनही पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण करत केले कैतुक