मुंबई -भारतीय अर्थव्यवस्थेला नवे आयाम मिळवून देण्याचे आणि जागतिक अर्थकारणात भारताचे अढळ स्थान निर्माण करण्याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना जाते. जगात मंदी असतानाही भारतात त्याचा परिणाम जाणवला नाही. आता मात्र सर्व जगातील मंदी उठून भारतात आली आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी लिहिलेल्या 'मनमोहन पर्व' या पुस्तकाचे थोरात यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
जागतिक अर्थकारणात भारताचे अढळ स्थान निर्माण करण्याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना'
देसाई यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे लिखाण केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत. सर्व जगभरात मंदीची लाट होती तेव्हा भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत होती. यामागे डॉ. सिंग यांची अर्थनीती होती, असे ते म्हणाले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना बाळासाहेब थोरात हेही वाचा - 'दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला, पराभवाची मालिका आता थांबणार नाही'
२०१४ नंतर ज्याला आपण राजकीय त्सुनामी म्हणतो, त्यावेळी डॉ. सिंग यांचे व्यक्तिमत्व अस्पष्ट झाले होते. मात्र, आता पुन्हा मनोहन सिंह चर्चेत आहेत, असे थोरात म्हणाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि आर्थिक उभारणीत कसे योगदान दिले याविषयी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी त्यांच्याबरोबरचे अनुभव सांगितले.
मनमोहन यांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान पाहता प्रेरित होऊन हे पुस्तक लिहिले. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण 'मनमोहन पर्व' पुस्तकात केले आहे, असे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप, विश्वास उटगी आदी उपस्थित होते.