महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणपती बाप्पा आमच्यावर कृपा कर..., बाळासाहेब थोरातांचे सिद्धिविनायकाला साकडे - Chhatrapati Shivaji Maharaj

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळी प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील, अशीच तुझी कृपा असू दे, असे गणपती बाप्पांना साकडे घातले.

माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारताना बाळासाहेब थोरात

By

Published : Jul 18, 2019, 2:17 PM IST


मुंबई- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका येत असून या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आमच्यावर तुझी कृपा असू दे! असे साकडे, काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सिद्धिविनायकाला घातले. त्याचबरोबर त्यांनी महापुरूषांच्या स्मारकांना अभिवादन करित माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची पदाची सूत्रे स्वीकारली.

माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारताना बाळासाहेब थोरात

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळी प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी तुझी कृपा असू दे, असे गणपती बाप्पांना साकडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत नवनियुक्त कार्याध्यक्ष बसवराज पाटील, डॉ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

चैत्यभूमीला जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन करताना बाळासाहेब थोरात

सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर थोरात यांनी थेट दादर गाठले. येथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमीला जाऊन अभिवादन केले. यावेळी थोरात यांच्यासह नवनिर्वाचित कार्याध्यक्ष नितीन राऊत होते. येथे काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी त्यांचे जोरदार घोषणा देऊन स्वागत केले. त्यानंतर थोरात यांनी शिवाजी पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेथून काँग्रेसचे मुख्य कार्यालय असलेल्या टिळक भवन येथे जाऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

अभिवादन करताना बाळासाहेब थोरात

यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. थोरात यांनी पदभार स्वीकारताना माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details