मुंबई- सत्तास्थापनेबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. मात्र, या मुद्यावर महाघाडीत मतभेत असल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादीसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस महाघाडीच्या घटक पक्षांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोशय्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी विशेष बातचीत केली.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री, महायुती करणार सत्ता स्थापन'
भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाआघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल कोशय्यारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीचे निवेदन दिले. काळजीवाहू सरकार असले तरी सरकार शेतकऱ्यांची काळजी घेत नसल्याचा आरोप यावेळी थोरात यांनी केला. ज्या पक्षाकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावे. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादी सोबत चर्चा झाली नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -होय आम्ही पवारांच्या संपर्कात; संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे सत्तेची समीकरण बदलणार का?