मुंबई - काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे सरकारचे अपयश समोर येत आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेण्याचे राजकारण केले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. केंद्र सरकारच्या विरोधात प्रश्न विचारले म्हणून प्रियंका गांधींची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी असल्याचेही थोरात यांनी म्हटले.
'केवळ राजकारण म्हणून प्रियांका गांधींची सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे दुर्दैवी' - बाळासाहेब थोरात केंद्र सरकार टीका
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेण्याचे राजकारण केले जात आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या आजी व देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबावरील संकटे संपलेली नसून त्यांना धोका आहे. हे माहित असूनही केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणे योग्य नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
प्रियांका गांधी यांनी त्यांच्या आजी व देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबावरील संकटे संपलेली नसून त्यांना धोका आहे. हे माहित असूनही केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणे योग्य नाही. सध्या देशभरात प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढते आहे. त्यामुळे भाजपाला याचा त्रास होत आहे. प्रियांका गांधींनी सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे थोरात म्हणाले. प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारत राहील, जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहील, त्यासाठी ते कोणालाही घाबरणार नाहीत, असा इशारा थोरात यांनी केंद्र सरकारला दिला.
दरम्यान, राज्यात विविध शहरात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या लॉकडाऊनच्या विषयावर थोरात म्हणाले की, कोरोनाचा प्रतिबंध आणि रुग्णसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते सर्व सरकार करत आहे. सरकारने घातलेले निर्बंध पाळून व्यवहारही सुरळीत करावे लागतील.