मुंबई:राज्यातील सरकार जनतेच्या प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत दिली गेली नाही. शेतीमालाला हमीभाव नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले तर दुसरीकडे जाचक अटीमुळे शेतकऱ्याना मदत मिळाली नाही. महागाई, बेरोजगारी, यावर उपाय करण्यापेक्षा शिंदे फडणवीस सरकार फक्त फक्त मोठे मोठे इव्हेंट करत स्वतःचे प्रतिमा निर्माण करीत आहे. जनतेला मात्र पोकळ घोषणा मिळाल्या. कर्नाटक राज्यातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले तर त्यापेक्षा जास्त शिंदे सरकार भ्रष्टाचारी आहे.
लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास वाढला: लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. सकारात्मक चर्चा होत आहे. महाविकास म्हणून एकत्र लढून भाजपाला पराभूत करायचे आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारंसघात काँग्रेसची ताकद आहे. त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरु. राज्यातील जनता शिंदे सरकारवर नाराज आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू असे चित्र आहे. भारत जोडो पदयात्रेचा फायदा कर्नाटक निवडणुकीत पाहायला मिळाला, दुसरी पदयात्रा काढली तर त्याचा फायदा निश्चिचत होईल. पदयात्रामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्यांवर चर्चा झाली आणि हेच निवडणुकीतील मुद्दे आहे.