मुंबई- सोनभद्र येथील घटना दुर्देवी आहे. प्रियांका गांधींना रोखणे व ताब्यात घेणे हे भाजपने केलेल भ्याड कृत्य असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यास निघालेल्या प्रियांका गांधीना मिर्झापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हत्याकांडानंतर घटनास्थळी कलम १४४ लागू असल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई केली. याविरोधात काँग्रेसने आज आंदोलन करत याचा निषेध केला आहे.
प्रियांका गांधींना रोखणे हे भाजपचे भ्याड कृत्य - बाळासाहेब थोरात
सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यास निघालेल्या प्रियांका गांधीना मिर्झापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हत्याकांडानंतर घटनास्थळी कलम १४४ लागू असल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई केली.
बाळासाहेब थोरात
या देशात लोकशाही आहे. आपण लोकप्रतिनिधी आहेत, दुर्देवी घटना घडल्यास आपला हक्क आहे तिथे जाऊन त्यांचे सांत्वन करणं. त्यामुळेच प्रियांका गांधी त्याठिकाणी जात होत्या. त्यावेळी त्यांना रोखणे, अटक करणे हे भाजपचे भ्याड कृत्य आहे. यामुळेच आम्ही आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम या सरकारकडून सुरू झाले. त्यामुळे आम्ही याचा विरोध करत असल्याचे थोरातांनी सांगितले.