महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी एक भूखंड देण्यासाठी पालिका सभागृहाची मंजुरी - शिवाजी पार्क, दादर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याचा भूखंड देण्यात आला आहे. या भूखंडाच्या बाजूला असलेला आणखी एक भूखंड देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारक : आणखी एक भूखंड देण्यासाठी पालिका सभागृहाची मंजुरी

By

Published : Aug 15, 2019, 5:16 AM IST

मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याचा भूखंड देण्यात आला आहे. या भूखंडाच्या बाजूला असलेला आणखी एक भूखंड देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क, दादर येथील महापौर बंगल्यात उभारले जाणार आहे. स्मारकाला यापूर्वी महापौर निवासासह एकूण ११ हजार ५५१.०१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा देण्यात आली आहे. या भूखंडावर महापौर निवास असून त्याला हात न लावता जमिनीखाली स्मारक उभारले जाणार आहे. ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासासह भूखंड देण्यात आला असताना या भूखंडाला लागून असलेला आणखी एक भूखंड स्मारकासाठी दिला जाणार आहे.

स्मारकासाठी दिला जाणारा हा भूखंड 1953 - 54 मध्ये केरलिया महिला समाज या संस्थेला भाडेतत्वावर देण्यात देण्यात आला होता. महापौर बंगल्याची जागा स्मारकाच्या ताब्यात देताना पालिकेने केरलिया महिला समाज या संस्थेला दिलेला भूखंडही ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. मात्र, या संस्थेने कोर्टात धाव घेतली. याबाबतचा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला. अखेर संस्थेने आणि पालिकेने तडजोडीने मार्ग काढला. त्यानंतर आता वाढीव 362.04 चौरस मिटरचा भूखंड स्मारकाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मारकासाठी एकूण ११ हजार ९१३ चौ.मी. जागा -

बाळासाहेब ठाकरे स्मारकाला महापौर निवासासह एकूण ११ हजार ५५१.०१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा देण्यात आली आहे. त्यात आता केरळीय महिला समाजाच्या ताब्यातील ३६२.०४ चौरस मीटरची जागा देण्यात येत असल्याने, स्मारकासाठी एकूण ११ हजार ९१३ चौरस मीटर इतकी जागा होणार आहे. भूखंडाचा वाद मिटल्याने बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details