मुंबई -मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा घेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी अभ्यास करूनच राजमुद्रा ध्वजावर स्थापित केली आहे. मात्र, राजमुद्रा असण्याला आक्षेप नोंदवणाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी येऊन चर्चा करावी. या चर्चेतून तोडगा काढावा, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संभाजी ब्रिगेड व मराठा क्रांती मोर्चाच्या समितीला केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला जितका सार्थ अभिमान तितकाच आम्हालाही आहे. लोककल्याणकारी राज्य या महाराष्ट्रात यावे इतकीच आमची अपेक्षा आहे. आतापर्यंतची सरकारे युती व आघाडीची होती. मात्र, आता त्यांनी स्वार्थ बघूनच सरकार स्थापन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा विचार राज ठाकरे यांनी केला. राजमुद्रा असलेला झेंडा हाती घेतल्याने आमच्यावरही बंधने आली असल्याचे नांदगावकर म्हणाले.