मुंबई -या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या एटीएस अधिकाऱ्याला वारंवार विशेष NIA जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास संदर्भात समन्स जारी करण्यात आला होता. मात्र, उपस्थित न राहिल्याने अखेर आज न्यायालयाने एटीएस अधिकाऱ्या विरोधात जामीन पत्र वॉरंट जारी केला आहे. या प्रकरणात अतिशय महत्त्वाचा एटीएस अधिकाऱ्याचा जबाब असल्याचे देखील माहिती मिळाली आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांकडून आठ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. यासंदर्भात आज हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, हजर न झाल्याने आज अधिकाऱ्या विरोधात जामीन पत्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुन्हा एटीएस अधिकाऱ्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी
मालेगाव बॉम्बस्फोट 2008 मालेगाव प्रकरणातील साक्षीदार असलेल्या एटीएस अधिकाऱ्या विरोधात आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टाने जामीन पात्र वॉरंट जारी केला आहे. 5000 च्या दंड भरून वॉरंट रद्द करता येणार आहे. यापूर्वी देखील दोन एटीएस अधिकाऱ्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. या याचिकेवर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
एनआयएच्या न्यायालयात सुनावणी - या प्रकरणात आतापर्यंत 30 साक्षीदार मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात फितूर म्हणून घोषित केला आहे. देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 28 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.
काय आहे प्रकरण -29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.