मुंबई:मंदिर परिसरात गांजाची शेती केल्याचा आरोप असलेल्या मंदिरातील पुजाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गांजा जप्त करण्यात आला असुन ती जागा पुजाऱ्याच्या मालकी हक्काची नव्हती, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी पुजाऱ्याची सुटका केली आहे.
ठोबळे यांना अटक: पुण्यातील शिरूर येथील पोलिसांनी मंदिराच्या पुजारी शांताराम ढोबळे यांच्याकडून 10 किलोग्राम गांजा जप्त केल्याचा दावा केला. त्याशिवाय मंदिरालगतच्या जमिनीवर गांजाच्या झाडांची लागवड केली जात असल्याचे आढळून आल्याचे सांगत पोलिसांनी ठोबळे यांना अटक केली. त्याविरोधात ढोबळे यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली आहे.