महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना जामीन मंजूर - bail pleas accepted by the mumbai highcourt of accused doctors

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन महीला डॉक्टर आरोपींचा जामीन मंजूर झाला आहे. तर, जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी तिन्ही आरोपींना मुंबई शहर सोडून बाहेर जाण्यास मनाई केली असून, मुंबई उच्च न्यायालयात एक दिवासआड हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ पायल तडवी

By

Published : Aug 9, 2019, 2:21 PM IST

मुंबई - नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहरे व हेमा आहुजा या तिन्ही महिला डॉक्टर आरोपींना मुंबई उच्च न्यायालयात प्रत्येकी 2 लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.


डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन महीला डॉक्टर आरोपींचा जामीन मंजूर झाला आहे. तर, जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी तिन्ही आरोपींना मुंबई शहर सोडून बाहेर जाण्यास मनाई केली असून, मुंबई उच्च न्यायालयात एक दिवासआड हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांशी कुठलाही संपर्क न करण्याचा आदेशही दिला आहे.


दरम्यान, डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी प्रमुख साक्षीदारांचे जबाब सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदवण्याचे सरकारी पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. या अगोदरच्या सुनावणीत डॉक्टरांचं काम हे खरंच सेवाभावी राहिलंय का? असा सवाल इथे उपस्थित होतो असे हायकोर्टाने म्हटले होते. डॉ पायल तडवी प्रकरणी, स्वतः डॉक्टर त्यांच्या सहकाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीने पाहत नाहीत, तर ते रूग्णांना कसं पाहत असतील? असा सवालही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी सुनावणी दरम्यान केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details