महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kadam Is Not Released Now: मंजूर जामीनाला आव्हान, राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांची तत्काळ सुटका नाही - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना सत्र न्यायालयाने पाच जिल्ह्यांतील गुन्ह्यांत मिळालेल्या जामीनाला राज्य सीआयडीने हायकोर्टात आव्हान दिले आहे, त्यामुळे त्यांची तत्काळ सुटका होण्याची चिन्हे नाहित.(Kadam Is Not Released Now)

Former MLA Ramesh Kadam
माजी आमदार रमेश कदम

By

Published : Jul 22, 2023, 4:36 PM IST

मुंबई : रमेश कदमांवर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून 312 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ते गेल्या आठ वर्षांपासून तुरुंगात आहेत. आता सीआयडीच्या अपिलामुळे कदम यांची तुरुंगातून लवकर सुटका होण्याची शक्यता धूसर झाली आहे. रमेश कदम यांना पाच जिल्ह्यातील गुन्ह्यांबाबत जामीन मंजूर झाला आहे.

गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांच्या विरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांनी या पाचही जिल्ह्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी जामीन मिळवा.म्हणून मुंबई सत्र न्यायालयाकडे काही महिन्यांपासून अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात जामीन मंजूर झाला. सत्र न्यायालयाने 15 दिवसांपूर्वी त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र राज्य सीआयडी कडून सत्र न्यायालयाने दिलेल्या जामीनाला आव्हान दिले आहे.

राज्य सी आय डी ने या जामिनाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळेच रमेश कदम यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. जमीन मंजूर होतांना सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बीड, हिंगोली, परभणी, जालना आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यामध्ये त्यांच्या संदर्भात दाखल गुन्ह्यातील जामीन अर्ज अखेर मंजूर केला होता. त्यामुळे रमेश कदम यांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला असे मानण्यात येत होते.

महाराष्ट्र शासनाने 2012 मध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतर त्यांच्या संदर्भात आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण समोर आले त्यानंतर सर्वात आधी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वेगवेगळ्या पाच जिल्ह्यांमध्ये त्यांच्या विरोधात आर्थिक घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते.

आठ वर्षापासून रमेश कदम हे अर्थररोड तुरुंगामध्ये आहेत. त्यांनी अनेकदा जामीन मिळावा या मागणीसाठी अर्ज केला होता. परंतु त्या त्या वेळी त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. नंतर जुलै च्या पहिल्या आठवड्यात अखेर त्यावर सुनावणी झाली आणि जामीन मंजूर झाला परंतु या मंजूर झालेल्या जामीनाबाबत राज्य सीआयडी असमाधानी आहे. म्हणूनच त्या निकालाच्या विरोधात त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details