महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai High Court : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जावर 15 डिसेंबर रोजी सुनावणी होणार - next hearing on 15 December

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (encounter specialist Pradeep Sharma) यांच्या जामीन अर्ज वरील सुनावणी पूर्ण (bail application next hearing) करण्यासाठी, पुन्हा त्याच खंडपीठाची स्थापना करण्याला मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी परवानगी दिली आहे. या अर्जावर 15 डिसेंबर रोजी सुनावणी (15 December Mumbai High Court) होणार आहे.

Mumbai High Court
5 डिसेंबर रोजी सुनावणी होणार

By

Published : Dec 8, 2022, 5:30 PM IST

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (encounter specialist Pradeep Sharma) यांच्या जामीन अर्जावर बहुतांश सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र काही मुद्यावर अद्याप सुनावणी होण्या अगोदरच, खंडपीठाच्या असाइनमेंट मध्ये बदल झाल्याने पुन्हा याच खंडपीठाचे गठन करण्यात यावे, अशी मागणी प्रदीप शर्मा यांच्या वकिलांकडून मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्याकडे करण्यात आली होती. याला आज परवानगी देण्यात (bail application next hearing) आली आहे. आता या अर्जावर 15 डिसेंबर रोजी सुनावणी (15 December Mumbai High Court) होणार आहे.


न्यायमूर्ती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठांसमोर प्रदीप शर्मा यांची जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. मात्र न्यायमूर्ती आर एन लड्डा त्यांच्या असाइनमेंट मध्ये बदल झाल्याने, खंडपीठ बदलण्यात आल्यामुळे प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी दुसऱ्या खंडपीठांसमोर पुन्हा होणार की नाही, असा प्रश्न खंडपीठांसमोर उपस्थित झाला होता. प्रदीप शर्मा यांच्या वकिलांकडून मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना विनंती करून, प्रदीप शर्मा यांच्या जामीनावर याच खंडपीठांसमोर सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याची विनंती केल्यानंतर मुख्य न्यायमूर्तीने विनंती मान्य करत, आज परवानगी दिली आहे.




वकील आबाद पोंडा यांनी सादर केलेल्या फोन लोकेशन आणी CDR चा खुलासा सादर करण्याचे निर्देश कोर्टाने NIA वकिलांना दिले आहे. NIA नं सदर केलेला लोकेशन दाव्यात तथ्य नसल्याचं दाखवतोय. CDR पुरावा मधूनही स्पष्ट होत आहे, असे आबाद पोंडा यांनी म्हटले आहे. न्यायाधीश मोहिते डेरे आणि न्यायाधीश आर एन लड्डा त्यांच्या खंडपीठ बदलत आहे. न्यायाधीश आर एन लड्डा यांच्याकडे सिविल खंडपीठ देण्यात येत असल्याने, मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या सोबत वकिलांनी चर्चा करावी, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी म्हटले आहे. आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.




मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय? :मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठ ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.


मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार माहिती पडले आहे. हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत डोक्यालाही मार लागलेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details