मुंबई- महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येत असताना 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीने महाआघाडीला समर्थन देण्याचे संकेत दिले आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हे सरकार माझे आहे यातच सगळं आले, असे सूतोवाच केले आहे. नवीन आमदारांच्या शपथविधीच्या विशेष अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.
'बहुजन विकास आघाडी'चे 'महाआघाडी'ला समर्थन देण्याचे संकेत
अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
हितेंद्र ठाकूर
हेही वाचा - उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 'मातोश्री'बाहेर झळकले बॅनर
अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तर नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.