मुंबई - घाटकोपर पश्चिम येथील पालिकेच्या माणिकलाल मैदानाची दुरवस्था झाली असून या मैदानाची सुरक्षा भिंत जागोजागी कोसळली आहे. मैदानात वाहनचालक मोठया संख्येने वाहन लावत आहेत. त्यामुळे मैदानाचा योग्य तो वापर होत नाही. मैदान वाचले पाहिजे याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी खेळाडूंच्या समुहामार्फत मैदानाची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे माजी खेळाडूंनी सांगितले.
घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात हेही वाचा - उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
मैदान मोठे असल्याने याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. तसेच या मैदानाच्या उपलब्धतेमुळे खेळाडुंनाही प्रोत्साहन मिळते. तसेच परिसरातील खेळाडूंच्या खेळांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत होती. मात्र, आता या मैदानात ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना भिंती व्यवस्थित आहेत. भिंती कोसळल्याने या मैदानात चहुबाजूने प्रवेश करण्यात येत आहे. त्यातच या मैदानात भर पडली ती शेजारच्या रहिवाशांनी साहित्य मैदानात टाकल्याने मैदानाची अवस्था डम्पिंग ग्राउंडसारखी झालेली आहे.
मैदानात रात्रीला दिवे नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात नशा करणारे युवक येऊन बसतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. या मैदानात पारशीवाडी, चिराग नगर, आजाद नगर, भटवाडी असल्फा टेकडी, मनिकलाल इस्टेट या परिसरातील खेळाडू या मैदानावर खेळायला येतात. क्रिकेट, कबड्डी खो-खो असे विविध खेळ खेळत होते. परिसरातील शाळांच्या स्पर्धा व विविध कार्यक्रमही पार पाडले जात होते. यातच काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथील एका इमारतीच्या मलबा या मैदानात आणून टाकला होता. त्यामुळे मैदान डम्पिंग ग्राउंडकडे वाटचाल करते की काय ही भीती स्थानिकांना व माजी खेळाडूना भेडसावत होती. त्यानंतर माजी खेळाडूंनी पालिका प्रशासनाला मैदानातील मलबा हटवण्यासाठी पत्रव्यवहार केला त्यानंतर तो हटवण्यात आला.
हेही वाचा - चालणारी झाडे... बालदिनानिमित्त चिमुकलीनं बनवलं अप्रतिम गुगल 'डुडल'