मुंबई - शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बुधवारी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धारेवर धरले. गुणवत्ता सुधारता येत नसेल तर शिक्षण विभागाची पुनर्रचना करावी, असे आदेशच बच्चू कडू यांनी यावेळी दिले. विधानभवन परिसरात झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बच्चू कडू यांनी राज्यातील संपूर्ण शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली.
राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर; गुणवत्ता सुधारत नसेल तर शिक्षण विभागाची पुनर्रचना करा - school education in maharashtra
राज्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बुधवारी मुंबईत बैठक पार पडली. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत काही सुचनाही केल्या. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच इतर उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
राज्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बुधवारी मुंबईत बैठक पार पडली. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत काही सुचनाही केल्या. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच इतर उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना या बैठकीत देण्यात आल्या. तसेच शिक्षकांची अ-ब-क अशी वर्गवारी करुन त्याचे परीक्षण वेळोवेळी झाले पाहिजे. शालेयस्तरावर जातिनिहाय होणारे गणवेश वाटप बंद करुन जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशांचे मोफत वाटप करण्यात यावे. यासाठी केंद्रशासनाचा निधी कमी पडत असेल तर राज्याचा निधी वापरण्याच्या सुचना राज्यमंत्र्यांनी यावेळी समग्र शिक्षा अभियानाच्या संचालकांना दिल्या आहेत. तसेच, अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत शिक्षक व परिचर यांच्या समावेशनाचे निर्देशही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा विकास महत्त्वाचा असून ज्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल त्या संबंधित शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.