महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bacchu Kadu : बच्चू कडूंना मिळाला मंत्रिपदाचा दर्जा, जाणून घ्या कोणते मिळाले खाते - महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असे सांगितले जाते आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत हा विस्तार झाला नव्हता. मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यात प्रहार संघटनेचे नेते यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

Bacchu Kadu
बच्चू कडू

By

Published : May 24, 2023, 11:12 AM IST

Bacchu Kadu : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. आता त्यांनी दिलेला पाठिंब्याचे त्यांना फळ मिळाले आहे. कारण शिंदे सरकारने अपक्ष आमदार बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडूंची निवड करण्यात आली आहे. या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

नाराजी दूर होणार : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल, असे वाटत होते. पण बच्चू कडू यांना अद्याप मंत्रीपद मिळाले नव्हते. परंतु आता दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. दरम्यान बंडखोरीला पाठिंबा दिल्यानंतरही मंत्रीपद मिळत नसल्याने बच्चू कडू हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने बच्चू कडूंची नाराजी थोडीतरी दूर होईल असा अंदाज आहे. मंत्रीपद मिळत नसल्यामुळे बच्चू कडू यांनी स्वत:ही अनेकदा उघड नाराजीचे विधाने केली होती.

मंत्रीमंडळ विस्तारावार काय म्हणाले बच्चू कडू : आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारात बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर बोलताना कडू म्हणाले की, “जेवणाचे आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरे नसते. घोडामैदान जवळ आहे. मंत्री झालो नाही तरीही कामे करतोय. मंत्री झालो तर वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला पाहिजे. विस्तार तातडीने झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणे आवश्यक आहे ही जनतेची मागणी आहे.” असे वक्तव्य बच्चू कडूंनी केले आहे. दरम्यान या विस्तारात मला मंत्रीपद मिळेल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शब्द दिला होता, ते आपला शब्द पाळतील असेही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा -

  1. Nitesh Rane On Trimbakeshwar :उरूस निघाल्यावर त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याची परंपरा नाही - आमदार नितेश राणे
  2. Sanjay Raut : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details