ठाणे: तक्रादार राम जेठानंद तनवानी हे उल्हासनगरातील भारत पॅलेस, इमारतीत कुटुंबासह राहतात.ऑक्टोंबर महिन्यात त्यांच्या घरात आरोपी महिला घरकाम मिळविण्याच्या उद्देशाने आली. त्यावेळी तनवानी यांनी तिला नकार दिला होता. तीन दिवसांनी तीने त्यांना पुन्हा घरकाम देण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी तीला घरकामासाठी ठेवले. तनवानी कुटूंब २३ ऑक्टोंबर रोजी घराला कुलूप लावून गेल्याची संधी साधत आरोपी बंटी बबलीने चोरलेल्या चावीने कुलुप उघडून घरातील ९१ तोळे सोने लंपास केले. तनवानी कुटूंबाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
Babli Arrested For Stealing Jewelry: उच्चभ्रू घरातून लाखोंचे दागिने चोरणारी बबली जेरबंद, बंटी फरार - बंटी फरार
उच्चभ्रू वस्तीत घरकाम करणारी मोलकरीण (Housemaid) असल्याचे सांगत, एका बंटी-बबलीच्या जोडीने (Bunty-Bubbly pair) डझनभर घरातील लाखोंचे दागिने लंपास (Stealing Jewelry) केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्या बबलीला जेरबंद केले (Confiscated) आहे. मात्र तिचा साथीदार बंटी फरार आहे.आशा उर्फ नर्मदा सोहेब खान असे या बबलीचे नाव आहे. तर महेश शिंदे असे फरारबंटीचे नाव आहे.
डझनावर घरातील दागिने लंपास
उल्हासनगर गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीसांच्या पथकाने समांतर तपास करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका फुटेजमध्ये बबली दिसली.यावरून तिची ओळख पटवून पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी बबली घरकामासाठी आली त्यावेळी तीने तीचे नाव आशा आहे असे सांगत इतर माहिती दिली नव्हती. पोलिसांना तपासात या जोडीने डझनभराच्यावर घरामधील लाखोंचे दागिने लंपास केल्याचे समोर आले.
व्हाट्सअप कॉल वर तावडीत सापडली
गुन्हे शाखा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिल मांगले यांनी तिचा शोध घेण्यासाठी बुलंद (उत्तर प्रदेश) अहमदाबाद (गुजरात), नाशिक, मुंबई भागात पथके पाठवले आणि तीचा शोध घेतला. आरोपी महीला सराईत गुन्हेगार आहे. पोलीसांच्या तावडीत न सापडण्यासाठी ती वेगवेगळया शहरात फिरत होती. नंतरती, मुंबईतील मुलुंड, परिसरात असून ती व्हाॅट्सअप कॉलिंग करून इतरांशी बोलत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळारचुन तिला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला.
पाच लाखाचे २५ तोळे सोने जप्त ..
आरोपी महीलेकडुन पाच लाख रुपये किंमतीचे २५ तोळे सोने जप्त केले असुन तिचा साथीदार महेश शिंदे हा फरार असून त्याचा शोध पोलीस पथक करीत असून त्याच्याकडूनही काही दागिने हस्तगत होतील अशी शक्यता उल्हासनगर गुन्हे शाखा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिल मांगले यांनी व्यक्त केली आहे.