महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इरफान खानचा मुलगा बाबीलने फोटो शेअर करत दिला जुन्या आठवणींना उजाळा - बाबील खान बातमी

अभिनेता इरफान खानचा मोठा मुलगा बाबील खानने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने काही ओळी लिहून वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेता इरफान खान
अभिनेता इरफान खान

By

Published : Oct 4, 2020, 7:55 PM IST

मुंबई - दिवंगत अभिनेता इरफान खानचा मोठा मुलगा बाबील खान याने एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हरहुन्नरी अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाहीत. मात्र, त्याच्या अनेक चित्रपटातून तो आपल्यातच असल्याचे जाणवते. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव त्याची अभिनयक्षमता ही अप्रतिम होती. इरफानचा मोठा मुलगा बाबील खानने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने काही ओळी लिहिल्या आहेत.

आपल्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू हा नेहमीच वेदनादायी असतो, कारण तुम्हाला त्यांना कधीच गमवायचे नसते. परंतु मृत्यू ही केवळ एक सुरुवात आहे, असे आपण मला शिकवले. आणि म्हणून मी आपल्या सर्व गोड कडू आठवणी मनात साठवून ठेवल्या आहेत. त्यांना आठवत मी नव्याने जगायला शिकतोय अशा भावनिक पोस्टसह त्याने हा फोटो शेअर केला आहे.

'एकदा मी बीटल्स ऐकत होतो तेव्हा तूम्ही मला 'द डोअर्स'बद्दल सांगितले आणि मला त्याचे वेड लागले. आपण तेव्हा सोबत गायचो. आज मी ती गाणी एकटाच गातो. मात्र, त्यावेळेस मला तुम्ही माझ्या आसपास असल्याची जाणीव होते. अशा शब्दात त्याने इरफानच्या आठवणींना उजाळा दिला.

दीर्घ काळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खान याचे २९ एप्रिलला मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. 'अंग्रेजी मिडीअम' हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याने एका मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमीका साकारली होती. त्याच्या पश्चात पत्नी सुतापा सिकदर आणि दोन मुले आहेत. इरफानशी जुळलेल्या अनेक आठवणी ते अधूनमधून सोशल मिडीयावर शेअर करत असतात.

ABOUT THE AUTHOR

...view details