मुंबई -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते. त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची बैठक पार पडली. यावेळी आव्हाड बोलत होते.
राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज यावेळी व्यक्त केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गोरेगाव सिद्धार्थनगर पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे आणि रहिवाशांचे थकलेले भाडे द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.