मुंबई -कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरात बसूनच साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे दरवर्षी गजबलेल्या चैत्यभूमीवर शांतता दिसून येत आहे. फक्त पासधारकांनाच आत जाण्याची परवानगी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : यंदाही चैत्यभूमी परिसर रिकामा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरात बसूनच साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे दरवर्षी गजबलेल्या चैत्यभूमीवर शांतता दिसून येत आहे. फक्त पासधारकांनाच आत जाण्याची परवानगी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती असून चैत्यभूमी येथे साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. नागरिकांना चैत्यभूमी परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांना घरबसल्या अभिवादन करता यावे यासाठी पालिकेकडून ऑनलाईन अभिवादनाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी शिवाजीपार्क ते चैत्यभूमी पर्यंत पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरवर्षी चैत्यभूमी परिसरात लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, कोरोनामुळे उलटे चित्र दिसून आले.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरात बसूनच साजरी करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. आंबेडकरी अनुयायांना घरातच बसून बाबसाहेबांना अभिवादन करणे शक्य व्हावे, म्हणून थेट प्रक्षेपणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.