ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : बारसिंगाच्या अंगावर जखमा, राणीबाग पुन्हा वादात सापडणार - baarsingaa Body wounds

दोन वर्षांपूर्वी पेंग्विनच्या मृत्यूमुळे झालेल्या टिकेनंतर नुकतीच राणीबागेत बारसिंगाची जोडी आणण्यात आली. या जोडीमधील एका बारसिंगाच्या अंगावर जखमा झाल्या असल्याने राणीबाग प्रशासन बारसिंगाची काळजी योग्य प्रकारे घेत नसल्याचा आरोप पर्यटकांकडून केला जात आहे. यामुळे राणीबाग प्रशासन पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंबई
author img

By

Published : May 7, 2019, 10:43 AM IST

मुंबई - प्राण्यांना योग्यप्रकारे सोयी-सुविधा दिली जात नसल्याने वादात सापडलेल्या भायखळा येथील राणीबागेचे नूतनीकरण करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी पेंग्विनच्या मृत्यूमुळे झालेल्या टिकेनंतर नुकतीच राणीबागेत बारसिंगाची जोडी आणण्यात आली. या जोडीमधील एका बारसिंगाच्या अंगावर जखमा झाल्या असल्याने राणीबाग प्रशासन बारसिंगाची काळजी योग्य प्रकारे घेत नसल्याचा आरोप पर्यटकांकडून केला जात आहे. यामुळे राणीबाग प्रशासन पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंबईच्या राणीबागेत प्राण्यांना योग्य प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जात नव्हत्या. प्राण्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नव्हती. प्राण्यांना छोट्या पिंजऱ्यात ठेवले जात होते. या कारणाने प्राणी मित्रांनी आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने राणीबाग आणि मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार ५३ एकर जागेवर नव्याने १७ पिंजरे बांधले जात आहेत. त्यापैकी पेंग्विन कक्ष आणि ३ पिंजरे सध्या बांधून तयार आहेत. दोन वर्षांपूर्वी राणीबागेत आणलेल्या ८ हंबोल्ट पेंग्विन पैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाला होता. यामुळे राणीबाग प्रशासनावर प्राणी मित्र आणि विरोधी पक्षांनी टीका केली होती. रस्ते बनवणाऱ्या कंपनीने पेंग्विन पालिकेला दिल्याने खोटे कागदपत्र बनवून पेंग्विन आणल्याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. लोकायुक्तांनी पालिकेला या प्रकरणी नोटीस बजावून सुनावणी घेतली होती. याप्रकरणी अद्यापही सुनावणी सुरु असल्याचे समजते.

मुंबई
राणीबागेत तीन पिंजरे बांधून तयार आहेत. त्यामधील एका पिंजऱ्यात नुकतेच कानपूर झुऑलॉजिकल पार्कमधून आणलेल्या बारसिंगाच्या जोडीला ठेवण्यात आले आहे.पेंग्विन प्रमाणेच बारसिंगालाही पाहण्यास पर्यटकांची गर्दी होत आहे. यामधून राणीबाग प्रशासनाला चांगलीच कमाई होत आहे. मात्र, बारसिंगाला पाहण्यास आल्यावर पर्यटकांना एका बारसिंगाच्या अंगावर जखमा दिसल्या. या जखमा पाहून "अरे याला लागलं तर आहे, त्याच्या अंगातून रक्त आले आहे", अशा प्रतिक्रिया पर्यटकांच्या तोंडून निघत आहेत. राणीबाग प्रशासन बारसिंगाकडे लक्ष देते कि, नाही असा प्रश्न पर्यटकांकडून विचारला जात आहे. बारसिंगाच्या अंगावरील जखमा पाहून कानपूरहून आणतानाच जखमा झालेला आजारी बारसिंगा तर आणण्यात आला नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिकाऱ्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट -

दरम्यान बारसिंगाच्या अंगावर असलेल्या जखमांसंदर्भात राणीबागेचे संचालक डॉ. त्रिपाठी यांच्याशी त्यांच्या राणीबागेतील कार्यालयात जाऊन संपर्क साधला असता, ते पाहुण्यांबरोबर बोलण्यात व्यग्र असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या कार्यालयात तासभर वाट बघूनही ते भेटले नसल्याने पुन्हा निरोप पाठवल्यावर त्यांच्या कार्यालयातून ते सकाळपासून बैठकीमध्ये व्यग्र असल्याचे सांगण्यात आले. यावरून राणीबाग प्रशासन बारसिंगाच्या प्रकरणावर पळ काढत असल्याचे समोर येत आहे.

कानपूरचा बारसिंगा -

कानपूर प्राणीसंग्रहालय यांच्याकडून ८ मार्चला बारसिंगा (स्वॅम्प डीअर) ची एक जोडी आणण्यात आली. सदर प्रजाती हरण संवर्गातील असून भारताच्या मध्य, उत्तर आणि ईशान्य भागांमध्ये आढळते. दोन्ही हरणेही पाच वर्षांची आहेत. त्यांचे सरासरी आयुष्यमान २३ वर्षे इतके असते. त्यांच्याकरिता बांधण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये, कृत्रिम तलाव, अन्न पुरवठ्याची खोली आणि विश्रामाकरिता दलदलीचा भाग व छप्पर या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details