महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी - शाह हे ईव्हीएमचे नेते, कोळसे पाटलांचा निशाणा - मोदी - शाह हे ईव्हीएमचे नेते

देशात आणि राज्यात आमचे मतदान ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या. अन्यथा आम्ही जेलभरो आंदोलन करु, असा इशारा माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील  यांनी दिला.

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील

By

Published : Aug 31, 2019, 9:52 PM IST

Updated : Aug 31, 2019, 11:13 PM IST

मुंबई - देशात आणि राज्यात आमचे मतदान ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या. अन्यथा आम्ही जेलभरो आंदोलन करु असा इशारा माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी दिला. मोदी शाह हे देशातील विरोधक संपवून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही कोळसे-पाटील यांनी केला. तसेच हे दोन्ही ईव्हीएमचे नेते असल्याचे ते म्हणाले.


गेल्या महिन्याभरापासून ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्ट्र यात्रेचा समारोप आज मुंबईत झाला. त्यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बी.जी. कोळसे-पाटलांचा मोदी - शाह यांच्यावर निशाणा

१४ तारखेला मुंबईत मानवी साखळी
येत्या १४ तारखेला मुंबईत रेल्वे स्थानके, कॉलेज यासह गिरगाव आदी ठिकाणी मानवी साखळी करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली जाणार आहे. यावेळी देशातील विरोधी पक्ष नेत्यांनी ईव्हीएम विरोधात एकत्र यावे. यासाठी आम्ही राज्यात आणि देशात मोदी-शाह आणि ईव्हीएम विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाचे नेतृत्व स्वीकारायला तयार असल्याचे कोळसे पाटील म्हणाले. तुम्ही आमचे नेते व्हा, पण आपण सर्व मिळून ईव्हीएम विरोधात आंदोलन करू. आपली चूल आता वेगळी करू नका, सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

मोदी शाह हे ईव्हीएमचे नेते
मोदी शहा हे देशातील आपले विरोधक संपवून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप कोळसे पाटील यांनी केला. त्यामुळेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यानंतरलगेच त्यांना ईडीची नोटीस नोटीस आली. यामुळे मागे सत्तेत असणारे अनेक लोक हतबल आहेत. जगात १८ देशात ईव्हीएम वापरली जाते, प्रगत देशातील लोकांनी ती नाकारली आहे. आपल्या देशात या मशीनमध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हाही त्याचा फायदा भाजपला होतो. आत्ता तर भाजप सत्तेत आहे, त्यामुळे त्यांनी याचा लाभ घेऊन सत्ता मिळवली असल्याचे ते म्हणाले.

गुजरातमध्ये विरोधकांना मारण्याची प्रयोगशाळा
मोदी पहिल्यांदा गुजरातमध्ये सत्तेत आल्यावर त्यांच्याकडे तेथे एकही जिल्हा परिषद नव्हती. परंतू, त्यांनी गोधरा घडवून आणली खोट्या अफवा आणि त्यांच्या विचारावर सत्ता आणली. 'गुजरातमध्ये विरोधकांना मारण्याची प्रयोगशाळा या लोकांनी सुरू केली होती. जे जे मोदीला मारायला आले ते ते मारले गेल्याचे कोळसे पाटील म्हणाले'. आमच्यावरही आरोप झाले, आम्ही मोदींना मारायला जातोय, परंतु ते खोटे होते हे सिध्द झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत खोटे बोलून प्रत्येक वेळी मुसलमानांना टार्गेट करून मोदींनी निवडणुका जिंकल्या आहेत.


मोदी-शाह आणि फडणवीस यांना घालवण्यासाठी देशात आणि राज्यात ईव्हीएम विरोधी आंदोलन देशभर छेडले पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आम्ही ५ तारखेला नागपुरात एक मोठे आंदोलन घेत असल्याचे कोळसे पाटील म्हणाले. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनीही मुंबईत १४ तारखेला केल्या जाणाऱ्या मानवी साखळीत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

Last Updated : Aug 31, 2019, 11:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details