मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ( Finance Capital of India Mumbai ) ओळख आहे. मुंबईत देशभरातून लाखो लोक आपले पोट भरण्यासाठी येतात. त्यापैकी अनेकांचे हातावर पोट असते. आझाद मैदानात ( Azad Maidan Mumbai ) आंदोलने सुरू असतात. अशा सर्वांचे पोट भरण्याचे काम आझाद मैदान येथील खाऊ गल्ली करते. ( Khau Galli Azad Maidan ) या ठिकाणी स्वस्त आणि मस्त खाण्याची सोय असल्याने हजारो लोकांसाठी ही खाऊ गल्ली जेवणाचा आधार बनली आहे.
अशी बनली खाऊ गल्ली -
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालयाला लागून आझाद मैदानाच्या गेट जवळ खाऊ गल्ली आहे. ही खाऊ गल्ली बनण्या आधी २० वर्षांपूर्वी राज्य सरकारचे झुणका भाकर केंद्र होते. ५० पैशात एक भाकरी आणि झुणका दिला जायचा. या झुणका भाकरचा आस्वाद घ्यायला लांबून लोक यायची. दुपारी जेवण्याच्या वेळेला या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. काही वर्षाने हे झुणका भाकर केंद्र बंद पडले. त्यानंतर बाजूलाचा कॅनॉनचे पावभाजी केंद्र सुरू झाले. त्याला लागून असलेल्या दुकानामध्ये खाण्याच्या पदार्थ विकले जाऊ लागले. यामुळे गेल्या काही वर्षांत ही गल्ली खाऊ गल्ली म्हणून प्रसिद्ध झाली.
स्वस्त आणि मस्त पदार्थ -