महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत लोकलवरील हल्ले रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून जनजागृती - मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त

मुंबईत येथे चालत्या लोकल, रेल्वे गाड्यांवर दगडफेक करून निष्पाप लोकांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणून कुर्ला रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारां विरूध्द कारवाई करण्यासाठी विक्रोळी येथे काल गुरूवारी प्रवासी सुरक्षा जनजागृती केली.

मुंबईत लोकलमध्ये हल्ले रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून जनजागृती

By

Published : Jul 26, 2019, 8:28 AM IST

Updated : Jul 26, 2019, 8:55 AM IST

मुंबई - येथे चालत्या लोकल, रेल्वे गाड्यांवर दगडफेक करून निष्पाप लोकांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणून कुर्ला रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द कारवाई करण्यासाठी विक्रोळी येथे गुरुवारी प्रवासी सुरक्षा जनजागृती केली.

मुंबईत लोकलवरील हल्ले रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून जनजागृती

गेल्या काही महिन्यात धावत्या लोकलवर दगडफेक, बाटली फेक, लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल, महिलांची पर्स हिसकावणे यांसारख्या घटनांमध्ये प्रवाशी चालत्या लोकलमधून पडून त्यांचा बळी जात आहे. यांसारखे प्रकार वाढल्याने रेल्वे पोलिसांनी कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या रेल्वे मार्गांवरील दहा धोकादायक ठिकाणाची निवड करत त्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे.

ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत असताना कुर्ला रेल्वे पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात बेवारस असलेले रेल्वे अपघातातील मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी एक बॅनर लावण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, आम्ही गुन्हेगारांना पकडण्यासाठी व नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. मात्र, जर त्यामध्ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असला, तर अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.

ही जनजागृती मोहीम मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार, पोलीस निरीक्षक सुरेखा मेढे आणि रेल्वेचे अधिकाऱ्यांनी जनतेस मार्गदर्शन केले, आणि जनसहभागासाठी आवाहन केले. यावेळी विक्रोळी येथील स्थानिक नागरिक व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Jul 26, 2019, 8:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details